बोर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ११ सप्टेंबर रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्यास्थितीत धरणातील पाणीपातळी ३२९.७२० मीटर असून, एकूण पाणीसाठा ९२.८५ टक्के इतका आहे. धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने पाणी नियंत्रित ठेवण्यासाठी, ता. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता बोर धरणाचे तीन दरवाजे प्रत्येकी २० सें.मी. ने उघडण्यात आले. यामुळे धरणातून ४५.६७ क्युमेक्स इतका विसर्ग बोर नदीपात्रात सोडण्यात आले आहे.