कारंजा शहरात दि. 13 सप्टेंबर रोजी पहाटे ५ :oo वाजता बंद घरात चोरीची घटना उघडकीस आली आहे. वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे कारंजा शहरातील नागरिक चिंतेत आहेत. करंजा शहरातील हसमणी परिसरात असलेल्या एका घरातून चोरट्यांनी ७० हजार रुपये रोख रक्कम चोरली. ज्या घरात चोरी झाली त्या घरातील १५ सदस्य हज यात्रेसाठी गेले होते. हे कुटुंब आज पहाटे ५:oo वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी परतले होते. जेव्हा त्यांनी घराचा मुख्य दरवाजा उघडला आणि आत गेले तेव्हा सर्वजण स्तब्ध झाले.