30 ऑगस्टला रात्री सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार कामठी विधानसभा क्षेत्रातील गावांमधील गोरगरिबांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हक्काचे घर देण्यात येईल त्यासाठी झूडपी जंगलाची जमीन व पट्टे ग्रामपंचायतीला सुपूर्द करू तसेच मालमत्तेची सदन न मिळालेल्या गावकऱ्यांना सदन देऊ असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. गावाच्या विकासासाठी सर्वात परी सहकार्य करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.