एकतीस ऑगस्टला उमरेड पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गोकुळ खदान पिराया शिवार येथे नाकाबंदी करून जनावरांची अवैद्यरित्या वाहतूक करणाऱ्या आरोपी अक्षय कुरुटकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीच्या वाहनातून एक गाय आणि एक वासरू जप्त केले. आरोपीकडून वाहन व गोवंश असा एकूण चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध उमरेड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.