यंदा सोलापुरात प्रथमच डॉल्बीमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक निघणार असल्याची माहिती मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उत्सव अध्यक्ष सोमनाथ मेंडके यांनी दिली. शुक्रवारी सकाळी ११ वाजता श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंडळाचे अन्य पदाधिकारीही उपस्थित होते. मेंडके म्हणाले की, “ध्वनीप्रदूषणमुक्त व संस्कृतीप्रधान मिरवणूक आयोजित करून सोलापुरात आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे ते म्हणाले.