जालना जिल्ह्यातील घनसावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विरेगाव येथून एक विवाहीता बेपत्ता झाली असून तीचा शोध घेतला जात नाही. तीचा शोध घेण्यासाठी तीच्या आईने पोलीसात धाव घेतली मात्र, पोलीसांनी तीच्यावरच गुन्हा दाखल केल्याचा आरोप गुरुवार दि. 4 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता महिलेने केला आहे. या प्रकरणी पिडीत महिलेने तीच्या पतीवर देखील गंभीर आरोप केला आहे. तीच्या पतीने दोन लाखात तिच्या मुलीला विक्री करुन तिचे लग्न लावून दिले असल्याचा आरोप केला आहे.