सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपद्रवी आजारी हत्तींना वनविभागाच्या माध्यमातून स्थलांतरित करण्याबाबत आज मंगळवार दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या समावेत वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपद्रवी आजारी हत्तींबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे द्यावा, जेणेकरून आजारी हत्तींची त्वरित दखल घेऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना वनतारा येथे स्थलांतरित करण्यात येईल.