आई शिंगुदेवी युवा मंडळ बांधवाडी, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी तर्फे रक्तदान शिबीर शुक्रवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता उत्साहात पार पडले. यावेळी 26 जणांनी रक्तदान केले. वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, रक्तदाते उपस्थित होते.