कामण- चिंचोटी मार्गाची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली असून पावसाळ्यात रस्त्यावर पाणी तसाचून अंदाजाने आल्याने अपघात घडत आहेत. कामण परिसरात रस्त्यावरील खड्डे व साचलेल्या पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित ट्रक रस्त्याच्या कडेला उलटल्याने अपघात घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अपघातग्रस्त ट्रकचे नुकसान झाले आहे.