नगर मनमाड महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून देहरे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात मुंबई येथील एक 24 वर्षे तरुणाचा मृत्यू झाला आहे शनिशिंगणापूरचे दर्शन घेऊन परतणाऱ्या या तरुणाला एका चारचाकी वाहनाने धडक दिल्याचे पोलिसांनी सांगितले या घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे