सोलापूर ग्रामीण त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील अवधे व्यवसायिकांचे कंबरडे मोडणार, अशी प्रतिक्रिया सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ शेअर करत दिली आहे. आज सोमवार दिनांक 01 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ शेअर करत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, सांगोला तालुक्यात त्यांनी मोठी कारवाई केली असून पंढरपूर तालुक्यात त्याचबरोबर सोलापूर ग्रामीण भागातही कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.