खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी खुद के गिरेबान मे झाक कर देखना चाहिए, अशी प्रतिक्रिया खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव न घेता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. ते आज सोमवार दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी बारा वाजता सोलापूर येथे बोलत होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थीच्या दबावामुळे आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोन केल्याची टीका मोहिते पाटील यांनी केली होती.