इंदापूर येथील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी इंदापूर पोलिसांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे. नो-पार्किंगमध्ये लावलेली वाहने, रस्त्यावर अडथळा निर्माण करणारी बेशिस्त पार्किंग आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 46 वाहनचालकांवर कारवाई करत पोलिसांनी 37,500 रुपयांचा दंड वसूल केला आहे.