उद्या दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना रंगणार आहे. मात्र या क्रिकेट सामन्याला ठाकरे गटाने विरोध केला असून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ठाकरे गटाच्या टीकेला ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी टेंभी नाका येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून आज दिनांक १३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास उत्तर दिलं आहे.