मलकापूर तालुक्यातील लासुरा येथे पतीकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तेजस्विनी मनोज गवई वय २२ वर्ष या विवाहितेने २० ऑगस्ट रोजी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी विनायक नथ्थुजी इंगळे यांनी पोलिसात तक्रार दिली. तेजस्वीनीचा पती मनोज गवई हा पत्नीला मारहाण करून तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. तसेच व्यवसायासाठी दोन लाख रुपयांची मागणी करत होता. या सततच्या छळामुळे तेजस्विनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.