तालुक्यातील उदयनगर-हरणी रस्त्यावर २४ मे रोजी दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. गावंडगाव (ता. पातूर) येथील शांताराम दलसिंग राठोड (वय ५०) हे आपल्या पत्नीसमवेत दुचाकी (एमएच २८ क्यू ७४८०) वरून हरणी येथे एका लग्नकार्याला जात होते. दरम्यान, नागझरी येथील राजेश गजानन साबळे (वय ३२) हे दुसऱ्या दुचाकीवरून (एमएच १३ डीएच ०५३२) उदयनगरकडे जात असताना दोन्ही दुचाकी एकमेकांना समोरासमोर धडकल्या. या अपघातात शांताराम राठोड आणि राजेश साबळे दोघेही गंभीर जखम