जिल्हा मुख्यालयापासून 15_ ते 20 किलोमीटरच्या परिसरात गोरेगाव तालुक्याला लागून असलेल्या पांगडी ते मंगेझरी रस्त्यावर मंगेझरी जवळ पट्टेदार वाघाचे दर्शन या रस्त्यावरून जाणारे किशोर शेंडे, श्रीरामनगर सडक अर्जुनी यांना झाले. आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान ते या रस्त्याने जात असताना त्यांना वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे असे आवाहन करण्यात आले आहे.