कुक्कुट पालन योजनेंतर्गत मंजूर झालेल्या शेड बांधकामाचे बिल काढून देण्याच्या नावावर गेल्या वर्षी ३ ऑगस्ट २०२३ रोजी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पशुधन विकास अधिकाऱ्याला मदत केल्याच्या आरोपावरून गोंदिया पंचायत समितीतील पशुधन पर्यवेक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज, (दि.२१) अटक केली आहे. तेजराम हौसलाल रहांगडाले ( वय ५७) पशुधन पर्यवेक्षक वर्ग-३, पंचायत समिती गोंदिया असे आरोपीचे नाव आहे.