आर्वी तालुक्यातील तरोडा येथून चुरा भरलेला आर जे 19 जी जे 31 12 क्रमांकाचा डंपर येळकेली येथे जात असताना मोरांगाना खरांगणा येथील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा डंपर नाल्याच्या पुलाच्या संरक्षण भिंतीला धडकून उलटला त्यामुळे चालक आणि क्लिनर दोघेही फसल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक दोन ला रात्री साडेदहा अकराच्या सुमारास घडली अपघातात रस्त्याकडेलाअसलेले घर विटा दुचाकी सायकल वीज खांब आधीचे ही नुकसान झाले याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याचे आज पोलिसांनी सांगितले..