खरंगाना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पाचोड शिवारातील असणाऱ्या नाल्याचे पाण्यात अनोळखी इसमाचा मृतदेह तरंगताना आज दुपारी 3 ,3.30 दरम्यान आढळून आला.. या घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी खरांगणा पोलिसांना दिली.. मृतदेह पाहा ण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती मृतक अंदाजे चाळीस वर्षाचा असून मासोळ्यांनी मृतदेह काही ठिकाणी विद्रूप केला होता खरंगाना पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून सामान्य रुग्णालय वर्धा येथे उत्तरिय तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती सायंकाळी सात वाजता दिली..