सानगडी जवळील विहीरगाव/बु येथे बैलपोळ्याचे आयोजन शुक्रवार दि.22 ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता करण्यात आले होते.यात65 बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या सजवलेल्या बैलांचे निरीक्षण प्रथम द्वितीय तृतीय बक्षीसे बैलमालकांना बैल पोळा आयोजक समितीतर्फे देण्यात आले तर सर्व 65 ही बैलजोडींच्या मालकांचा मा.जिल्हा परिषद सदस्या माहेश्वरी नेवारे यांच्या हस्ते शेतकरी सन्मान दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन मनोहर इटवले यांनी केले