महाड विधानसभा मतदारसंघातील बांधकाम कामगारांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. कामगारांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेत आपल्या मुलाबाळांना चांगले शिक्षण देऊन सुसंस्कारी पिढी घडवावी. आज बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास पोलादपूर येथे झालेल्या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नोंदणीकृत ४०० कामगारांना गृहपयोगी साहित्य संचांचे वाटप करण्यात आले.