राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कोपरगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देऊन गोपीचंद पडळकर यांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप वर्पे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते