बदलापूर येथे एक धक्कादायक घटना आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आली आहे. एका रिक्षाचालकाने एका कारचालकाला बेदम मारहाण केली असून कारचालकाच्या गाडीची मागची काच देखील फोडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर रिक्षाचालकाने कारवर दगड टाकून काच फोडली व कारचालकाला मारहाण केली. सदर कारचालक आपल्या मुलींना शाळेतून नेण्यासाठी आला होता. काही शुल्लक कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर रिक्षाचालकाने कारचालकाला मारहाण केली.