शिवसेना नेते तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी (ता.01) वैजापूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या नागमठाण, बाजाठाण, अव्वलगाव, चेंडुफळ, शनि देवगाव, चांदेगाव या गावातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे प्रतिपादन केले.