राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विरार येथील इमारतीतील दुर्घटनेते जखमी नागरिकांची रुग्णालयात भेट घेतली. जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करत वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत उपचाराबाबत व प्रकृतीबाबत माहिती घेतली. जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश यावेळी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना व प्रशासनाला प्रताप सरनाईक यांनी दिले.