सोलापूर शहरातील भवानी पेठ परिसरात नॅशनल लॉंड्रीजवळ मंगळवारी पहाटे (सकाळी ६ वाजता) झाड कोसळल्याने १८ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. जखमी तरुणाचे नाव रोहन श्रीनिवास गोसकोंडा (वय १८, रा. भवानी पेठ, सोलापूर) असे आहे. घटनेच्या वेळी तो झाडाखाली थांबला असताना झाड अचानक कोसळले. त्याला तातडीने उपचारासाठी कुंभारी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजकुमार पाटील यांनी मंगळवारी सायं 5 वाजता पत्रकारांशी बोलताना दिली.