सालाबादप्रमाणे याही वर्षी जामवाडीसह जिल्हाभरात बैलापोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पोळ्याचा मुहुर्त हा शुक्रवार दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 ते साडेपाच होता, त्यामुळे शेतकर्यांनी त्याच वेळेत बैलांची पुजा करुन बैल पोळा साजरा केला. शेतकरी आपल्या बैलांना उतराई होण्यासाठी त्याला गोडगोड पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालून साजरा करतात. यावर्षी पाऊस मान चांगले असले तरी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पिकांचे नुकसान झाले. तरी देखील शेतकर्यांनी राबणार्या बैलांना सजवून सण साजरा केला.