कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथे दारूविक्री बंदीचा ठराव सोमवारी पारित करण्यात आला. गावात चोरट्या मार्गाने दारू विक्री करताना आढळून आल्यास संबंधितावर दंडाची तरतूद व कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. देऊळगाव येथे दारू विक्रीची परिस्थितीत लक्षात घेता, मुक्तिपथ टीमने गावातील महिलांची बैठक घेऊन दारू विक्रीमुळे गावावर होणारे परिणाम विशद केले. सरपंच विजय तुलावी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेत महिलांनी आमच्या गावात दारूविक्री नको, अशी स्पष्ट भूमिका घेतली.