जिंतूर ते गडगव्हाण या मार्गावर जाणाऱ्या एसटी बसमध्ये सोमवारी दुपारी प्रवासादरम्यान वझर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.असीत योगीराज वानखेडे (वय 26 वर्षे) यांचा मृत्यु झाल्याची घटना पाचेगाव जवळ दिनांक 8 रोजी रात्री आठच्या सुमारास उघडकीस आली. अचानक प्रकृती बिघडल्याचे पाहून बसचालक व वाहकांनी तातडीने बस रस्त्यात थांबवून जवळच्या दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टरांनी तपासून त्या प्रवाशाला मृत घोषित केले.