गोरेगांव पोलीस स्टेशनचे ठानेदार आर.जे.पिंपरेवार यानी हस्तिनापुर (हिरापुर) येथील विहिरिचे निरीक्षण केले व भेट दिली.हस्तीनापुर हिरापूर येथील विहीरीसंदर्भात गावकऱ्यांच्या मनात वेगवेगळ्या चर्चा असताना सदर विहिरीत कधी खूप पाणी तर कधी खळखळाट पाहायला मिळतो.हा सारा प्रकार गावकऱ्यांसाठी कुतुलाचा विषय बनला असला तरी प्रशासनाने या गंभीर बाबीची अजूनही दखल घेतलेली नाही.20 फूट खोल असलेल्या विहिरीतील भूगर्भात नेमके काय सुरू आहे.कधी पाणी उकडल्यासारखे तर कधी विहिरीत पाण्याचा खळखळाट पहायला मिळतो.