नेर तालुक्यातील माणिकवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कृषी विभागातर्फे आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये धनज, माणिकवाडा, मांगलादेवी, चिचगाव ब्राह्मणवाडा पूर्व पिंपरी या परिसरातील शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी आरोग्य अधिकारी जया चव्हाण तसेच मंडळ कृषी अधिकारी प्रशांत जोल्हे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर भिराने तर आभार धीरज धनसकार यांनी मानले.