आर्ट ऑफ लिविंगतर्फे देशभरात काढण्यात आलेली 'सोमनाथ ज्योर्तिलिंग दर्शन यात्रा' सोमवारी, २४ जून रोजी दुपारी चार वाजता ओंकारेश्वर मंदिरात दाखल झाली. या यात्रेच्या आगमनानंतर मंदिरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी यात्रेकरूंनी १०८ फेऱ्यांमधून एक लाख आठ हजार वेळा 'ओम नमः शिवाय' मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली.