मुलचेरा तालुक्यात लगाम, लगामचेक, चुटगुंटा, शांतीग्राम व काकरगट्टा या गावांमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असून, गेल्या पंधरवड्यात ६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कीटकजन्य आजाराची समस्या असतानाच, अवजड वाहतुकीमुळे वाढलेल्या धुळीमुळे महामार्गालगतच्या गावांमध्ये श्वसनविकाराचा धोका वाढला आहे. लगाम प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत डेंग्यूने सहा जणांचा मृत्यू झाल्याने नागरिक धास्तावले आहेत, त्यातच धुळीचा त्रासही प्रचंड वाढला आहे.