सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम उपविभाग दोडामार्ग कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता झाले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.