धुळे तालुक्यातील निमखेडी रोडवरील जापी गाव शिवारातून दिवसाढवळ्या शेतकरी भूपेंद्र संजय पटेल (३९) यांची होंडा शाईन दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. २३ ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दहा वाजेच्या दरम्यान त्यांनी शेतात कामासाठी दुचाकी उभी केली असता चोरी झाली. परिसरात शोध घेतल्यानंतरही दुचाकी न सापडल्याने पटेल यांनी सायंकाळी साडेसातला तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, हेड कॉन्स्टेबल धनगर पुढील तपास करीत आहेत.