गणपती विसर्जन मिरवणूकीत शहर पोलीस स्टेशन येथे एक विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. शनीवारी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते पोलीस स्थानकातील गणरायाची आरती करण्यात आली. यानंतर जळगाव शहरातील एका बँकेच्या वतीने विसर्जन मिरवणूकीत पोलीस बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस बांधवांसाठी फूड पॅकेट वितरण मोफत करण्यात आले.