आ.खोतकरांचे उपमुख्यमंत्री शिंदेंकडे साकडे, शिंदेंचा पालीका आयुक्तांना एक फोन अन् गणेशभक्तांचे विघ्न दूर; सेवा शुल्क माफीचा निर्णय.. आज दिनांक 27 बुधवार रोजी सकाळी 9:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गणेशोत्सव काळात जालना शहर महानगर पालिकेने गणेश मंडळांवर आकारलेले 2500 रू. सेवा शुल्क तात्काळ माफ करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अर्जुन खोतकरांनी गणेशभक्तांच्या वतीने शिंदे यांच्याकडे साकडे घातले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी थेट महापालिका आयुक्त संतोष खां