नाना पेठेत टोळीयुद्धाचा भडका उडाला, आणि रक्तरंजित थरार दिसून आला. आंदेकर टोळीचा आधारस्तंभ व माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा वर्षभरापूर्वी म्हणजेच एक सप्टेंबरला खून करण्यात आला होता. त्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याच्या मुलाचा आयुष गणेश कोमकर याचा काल रात्री गोळ्या घालून खून करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा खून आंदेकर टोळीने केला आहे. दोघांनी मिळून त्याला पार्किंगमध्ये गोळ्या घातल्या.