राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, गणेशपेठ येथे नागपूर ग्रामीण क्षेत्र आढावा बैठक नागपूरचे निरीक्षक माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकी दरम्यान निरीक्षक माजी आमदार श्री जैन यांनी नागपूर ग्रामीणमधील सहा विधानसभा क्षेत्रांचा विधानसभा अध्यक्षांकडून सविस्तर आढावा घेतला. ग्रामीण भागात पक्ष वाढीसाठी बूथ संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.