सांगोला शहरातील होळकर सभागृहात आद्य क्रांतिकारक, नरवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी संवाद साधला. नरवीर राजे उमाजी नाईक यांनी आपल्या गनिमी काव्याच्या अद्वितीय युद्धकौशल्यानं ब्रिटिश राजवटीला हादरवून सोडलं होतं. परकीय राजवट भारतात स्थिरावू नये म्हणून त्यांनी सशस्त्र लढा दिला आणि मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिल्याचे सांगितले. सदरची जयंती ७ सप्टेंबर सकाळी अकराच्या सुमारास साजरी करण्यात आली.