पंढरपूर शहरातील तीन अवैध सावकारी करणाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली आहे. याबाबत सज्जन कल्लाप्पा माने यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती यानुसार तिघांना अटक करण्यात आली असून चौघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती, अशी माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी दिली आहे. आज शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना त्यांनी माहिती दिली.