आज शुक्रवार दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मिराडोर मलबार हिल येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या जनता दरबारात मंगल प्रभात लोढा यांनी मलबार हिल मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या, सूचना आणि मागण्या ऐकल्या आणि त्या सोडवण्यासाठी सकारात्मक पावले उचलली. तसेच, १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामूहिक रथयात्रेसाठी मुंबईतील २०० हून अधिक जैन संघटनांकडून मला आमंत्रण मिळाले, जे मी आनंदाने स्वीकारले.