मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रकचा भीषण अपघात घडला आहे. ढेकाळे नजीक उड्डाणपुलावरून ट्रक अचानक खाली सर्विस रोडवर कोसळला. ट्रकमधून कलरच्या डब्यांची वाहतूक होत होती. ट्रकखाली कोसळल्याने हे डब्बे रस्त्यावर पडले व कलर सर्वत्र रस्त्यावर पसरला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले अपघातग्रस्त ट्रक बाजूला सारून वाहतूक सुरळीत करण्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र ट्रक आणि ट्रक मधून वाहतूक होत असलेल्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे.