निफाड तालुक्यातील निसाकाचा गळीत हंगाम २०१४ पासून बंद आहे. निसाकात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाले असून कामगारांचीही देणी थकली आहे. त्यामुळे या कारखान्याच्या विक्रीचा घातलेला घाट रद्द करून निसाका सुरू करावा, अशी मागणी करत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना पत्र लिहित साकडे घातले आहे.अशी माहिती आज शिवसेना तालुका प्रमुख खंडू बोडके यांनी दिली