उर्स ते परंदवडी रोडवर एका तरुणाला अडवून त्याच्याकडील रोख रक्कम असलेले पाकीट पिस्तुलाचा धाक दाखवून लुटण्यात आले. ही घटना रविवारी (१६ ऑगस्ट) रात्री उर्स येथील के. एल.टी. कंपनीजवळ घडली. या प्रकरणात निखिल उत्तम बेरगळ (२०, सोमाटणे फाटा, ता. मावळ) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ऋषिकेश उर्फ शे-या राजू अडागळे याला अटक केली आहे.