राज्य परीक्षा परिषदेने महा टीईटी अर्ज भरण्यास दि. 9 ऑक्टोबर रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ दिल्याची माहिती दि. 03 ऑक्टोबर रोजी जिमाकाच्यावतीने देण्यात आली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनांसह अनेक विद्यार्थ्यांनी मुदतवाढीची मागणी केली होती. 23 नोव्हेंबर रोजी टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.