धाड येथे 4 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते मातृत्व बाल रुग्णालय व शिवशक्ती मेडिकलचा भव्य शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या सुविद्य पत्नी सौ. निर्मलाताई दानवे , शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, जिल्हा परिषद सदस्य आशाताई पांडे, शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश गुजर आदी उपस्थित होते.