करमाळा शहरातील बायपासला हॉटेल जगदंबाजवळ मालवाहतूक गाडीच्या धडकेत मोटरसायकल वरील दोघे भावंडे जखमी झाले. करमाळ्यातील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना अहिल्यानगर येथे दाखल केले आहे. महेश महादेव गवळी (वय २०) व शुभम महादेव गवळी (वय १६) दोघेही राहणार बिटरगाव करमाळा अशी जखमींची नावे आहेत. शुभम हा महात्मा गांधी विद्यालयात दहावीत शिक्षण घेत आहे. तो कामावर जात असलेल्या मोठ्या भावाबरोबर शाळेसाठी येत असताना हा अपघात झाला आहे. अपघातात मोटरसायकलचा चक्काचूर झाला आहे.