आज दिनांक 23 ऑगस्टला मांगलादेवी येथे तान्हा पोळा पार पडला. यावेळी लहान चिमुकल्यांनी अतिशय सुंदर असे बैल बनवून तान्हा पोळ्यात आणले होते. गावातील पंच कमिटीने चिमुकल्यांनी आणलेल्या बैल जोडीचे निरीक्षण करून सर्वांना बक्षीस दिले. यावेळी चिमुकल्यांचा आनंद वाढविण्यासाठी युवकासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.